विदर्भ विभागीय कुस्तीगीर संघाची विभागीय बैठक संपन्न
- राज्यसरकारच्या नाविण्यपुर्ण योजनेतुन विदर्भातील जिल्हा कुस्तीगीर संघटनेला कुस्तीची मॅट उपलब्ध करुन देण्याकरिता प्रयत्न करणार
- विदर्भ विभागीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : विदर्भात कुस्तीला महत्व देण्याकरिता विदर्भ विभागीय कुस्तीगीर संघाला प्रयत्न करणे आवश्यक आहे, यासाठी पदाधिकारी व सदस्यांनी सर्वाेतोपरी प्रयत्न करुन विदर्भातील कुस्तीगीराला राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय व ऑलपींक खेळण्याकरिता प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विदर्भ विभागीय संघटनेत संलग्नीत विदर्भातील सर्व जिल्हा कुस्तीगीर संघटनेला बळकटी देण्याकरिता राज्य सरकारच्या नाविण्यपुर्ण योजनेतुन प्रत्येक जिल्हा कुस्तीगीर संघाला कुस्तीची मॅट उपलब्ध करुन देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे विदर्भ विभागीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस योवळी म्हणाले.
विश्राम गृह, वर्धा येथे विदर्भ विभागीय कुस्तीगीर संघटनेची विभागीय बैठक खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, बैठकीला दिलीपसिंह सानंदा, सचिव गणेश कोहळे, डॉ. संजय तिरथकर, अनिल पांडे, रणजीतसिंह राहल, जितेन्द्र राजपुत, जयशंकर धुर्वे, दिलीप इटनकर, पंकज गावंडे, अशोक देशमुख, ध्येर्यशील काटकर, उध्दव बाकडे, शाम राजुरकर, श्याम रणदिव, मदनसिंग चावरे, दिनेश क्षिरसागर उपस्थित होते.
विदर्भ विभागीय कुस्तीगीर बैठकीमध्ये विदर्भ केसरी स्पर्धा, कुस्तीगीर/पंच/कोच तयार करण्यासाठी अमरावती व नागपूर विभागावर शिबीर घेणे, विदर्भातील पंच यांना राष्ट्रीय स्पर्धेकरिता पाठविणे, राष्ट्रीय स्पर्धा, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद संबधीत विषय, अखिल भारतीय कुस्ती संघ संबधीत विषय तसेच बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये राष्ट्रीय स्पर्धा वर्धा, पुणे व यवतमाळ येथे आयोजीत करणे, महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुणे, विदर्भ केसरी स्पर्धा अमरावती, वाशिम, अकोला, नागपूर व भंडारा या जिल्हयांनी मागणी केलेली आहे. या पैकी एका ठिकाणी स्पर्धा आयोजीत करणे, तसेच विदर्भ कुमार व महिला कुस्ती स्पर्धा वरुड जि. अमरावती येथे आयोजीत करण्यात येणार आहे.
बैठकीला विदर्भातील सर्व जिल्हा संघटनेचे ईश्वर मेश्राम, कुणाल वडीचार, गोवर्धन वरठी, रामचंद्र यंेगड, निलेश राऊत, चंद्रशेखर गमे, रामदास शहारे, प्रशांत खोब्रागडे, आर.ए.वाडीया, सतिश वाघमारे, प्रभाकर पावने, राकेश देशमुख, प्रल्हाद आळणे, सतिश वानखेडे, संदिप खरे, दयाराम भोतमांगे, पांडुरंग कढे, दत्तात्रय धोटे, अततान नशीर पठाण, श्रीकांत मेकलोम, मंगेश ठाकरे, जगदीश धोटे, अक्षय ठांेबरे, चंदु शिरसाट, अमित गावंडे, अनिल पावडे, प्रशांत तिवारी, राजु वैद्य, गोपाळ जांभुळे, सारंग परदेशी, विजय बुच, रमेश खाडे व इतर सदस्य उपस्थित होते.
News - Wardha