गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहारप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल


- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर :
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी ५ जणांवर पोलिस स्टेशन नागपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरने केली असून या कारवाईने गैरव्यवहार करणारया अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आदेशानुसार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराप्रकरणी उघड चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्यात आले हाते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक यांच्याकडून विदर्भातील पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील कामांच्व्या निविदा प्रक्रियेदरम्यान व कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंबंधी चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले. त्याआधारे पोलिस अधीक्षकांनी विविध कामातील निविदा प्रक्रियेदरम्यान झालेल्या गैरव्यवहारासंबंधाने उघड चौकशी करण्याचे आदेश विशेष तपास पथकातील संबंधित चौकशी अधिकरी यांना दिले. सदर उघड चौकशी दरम्यान गोसीखुर्द उजवा मुख्य कालवा ६ ते ३० किमीमधील अस्तरीकरण या कामाच्या निविदा प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे व त्यामध्ये जलसंपदा विभागातील तत्कालीन अधिकारी यांचा सहभाग असल्याचे दिसून आले. याबाबत चौकशी अधिकारी यांनी ११ मार्च २०२० रोजी पोलिस स्टेशन नागपूर शहर येथे दिलेल्या तक्रारीवरून अपराध क्रमांम १४९/२० कलम १३ (१) (क), (ड) सह १३ (२) ला. प्र. कायदा १९८८ अन्वये दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आरोपी लोकसेवक तत्कालीन कार्यकारी अभियंता केशव चंद्रकांत तायडे, तत्कालीन अधीक्षक अभियंता संजय लक्ष्मण खोलापूरकर सेवानिवृत्त, तत्कालीन मुख्या अभियंता सेवानिवृत्त सोपान रामराव सूर्यवंशी, तत्कालीन कार्यकारी संचालक सेवानिवृत्त रोहिदास मारोती लांडगे, वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी गोसीखुर्द डावा कालवा विभाग वाही पवनी, जि. भंडारा धनराज आत्माराम नंदागवळी हे जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून पोलिस स्टेशन सदर नागपूर येथे अपराध क्र. १४९ /२०२० कलम १३ (१) (क), (ड), सह १३ (२), ला. प्र. कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास करण्यात येत आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक तथा विशेष तपास पथकाचे प्रभारी अधिकारी राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाचे समन्वय अधिकारी पोलिस उपअधीक्षक मिलिंद तोतरे, नाईक पोलिस शिपाई मनोज कारनकर, गजानन गाडगे, चालक नाईक पोलिस शिपाई विकास गडेलवार यांनी केली आहे.
  Print


News - Nagpur | Posted : 2020-03-11


Related Photos