ज्योतिरादित्य शिंदे यांचा गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश


- १३ मार्चला राज्यसभेसाठी भरणार उमेदवारी अर्ज

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
मध्य प्रदेशातील राजकीय भूकंप आणत काँग्रेसला धक्का देणारे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मंत्री धर्मेंद्र प्रधान, उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते. ज्योतिरादित्य शिंदे उद्या भोपाळला जाणार असून ते १३ मार्चला राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
ज्योतिरादित्य शिंदे यांची आजी आणि ग्वाल्हेरच्या राजमाता विजयराजे शिंदे यांनी आपली राजकीय कारकिर्द काँग्रेसपासून केली. सन १९५७ मध्ये त्या गुना लोकसभा मतदारसंघातून विजयी होत संसदेत पोहोचल्या. १० वर्षे काँग्रेसमध्ये काढल्यानंतर सन १९६७ मध्ये त्या जनसंघात गेल्या. विजयराजे यांच्यामुळेच त्यांच्या विभागात जनसंघ मजबूत झाला. १९७१ मध्ये जेव्हा देशभरात इंदिरा गांधी यांची लाट आल्यानंतर देखील जनसंघाला येथून तीन जागा मिळाल्या. विजयराजे सिंधिया भिंडमधून, अटलबिहारी वाजपेयी ग्वाल्हेरमधून आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे गुना येथून विजयी झाले  Print


News - World | Posted : 2020-03-11


Related Photos