सांगलीत जमिनीच्या वादातून आईवडील व बहिणीची केली निर्घृण हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / कोल्हापूर :
मुलानेच आपल्या आईवडिलांचा आणि बहिणीचा निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी मध्ये ही घटना घडली. जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेचे वृत्त ऐकून सारेच सून्न झाले आहेत. गुरुलिंगप्पा अन्नाप्पा अरकेरी (८२), नागवा गुरुलिंगप्पा अरकेरी (७५) आणि समुद्राबाई बिरादार (६२) अशी मृतांची नावे आहेत.
संशयित आरोपी सिद्धपा गुरुलिंगप्पा अरकेरी (५८) याने हे तिहेरी हत्याकांड केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून घटनास्थळी उमदी आणि जत पोलीस दाखल झाले आहेत. आज सकाळी हा हत्याकांडाचा प्रकार उघडकीस आला.दरम्यान, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गावकरी तसेच नातेवाईकही दाखल झाले असून काहीसे तणावाचे वातावरण आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2020-03-11


Related Photos