आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलिस दलाने सुरू केले ‘ऑपरेशन रोशनी'


- महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ५ महिलांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून गडचिरोली पोलिस दलाने गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून 'ऑपरेशन रोशनी’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार असून आवश्यक रुग्णांना मोफत औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या उपक्रमाला पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दुर्गम भागातील ५ महिला व ६ पुरुष अशा एकूण ११ जणांवर ‘ऑपरेशन रोशनी‘ अतर्गत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीवनातला अंधःकार दूर करण्यात आला. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सर्व रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रुग्णांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने गडचिरोली पोलिस दलाने सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाचे स्वागत करून गडचिरोली पोलिस दलाचे आभार मानले. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सदर उपक्रम व्यापक प्रमाणात सुरू करण्याचे संकेत देतानाच जिल्हाभरातील गरजू नागरिकांना ‘ऑपरेशन रोशनी‘ उपक्रमात सहभागी होवून 'ऑपरेशन रोशनी’ उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-07


Related Photos