गडचिरोली महिला पोलीस येत्या काळात नक्षलवाद्यांशी सामना करणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील चौक्या आणि गस्तीवर महिला पोलिसांची मोठ्या संख्येने नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे  येत्या काळात या महिला पोलीस नक्षलवाद्यांशी सामना करणार आहेत.
 या महिला पोलीस आता नक्षलवाद्यांशी दोन हात करताना दिसतील. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी याबाबत माहिती दिली. गडचिरोली पोलीस दलात ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. स्थानिक महिलांसाठी या जागा राखीव असून या महिला पोलिसांच्या नियुक्त्या नक्षलग्रस्त भागातील चौक्यांमध्ये करण्यात आल्या आहेत. तसेच  गस्ती पथकातही त्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे नक्षलग्रस्त भागात त्या गस्त घालताना दिसतील. याशिवाय नक्षलवादविरोधी अभियानामध्येही  त्या सहभागी होणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिली.




  Print






News - Gadchiroli | Posted : 2020-03-07






Related Photos