येस बँकेची डिजिटल सेवा खंडीत, खातेदारांची होत आहे कोंडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्यानंतर येस बँकेचे खातेदार आणि ठेवीदारांची पैसे काढण्यासाठी धावाधाव सुरु आहे. बँकेचे नेट बँकिंग, मोबाइल ऍप, डेबिट आणि क्रेडीट कार्ड, चेक क्लिअरिंग आणि एटीएम  सेवा पूर्णपणे खंडीत करण्यात आली आहे. हे कमी कमी की काय तर गुगल पे, फोन पे सारखी इतर मोबाइल वॉलेट्स आणि इतर बँकेच्या एटीएम मधून येस बँक खातेदारांना आर्थिक व्यवहार करता येत नसल्याने बँक खातेदारांची पुरती कोंडी झाली आहे. दरम्यान, निर्बंधानंतर येस बँकेच्या शाखांना पोलीस छावणीचे स्वरूप आले असून प्रत्येक शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार येस बँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांना महिनाभरात एकदाच ५० हजारांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. त्यामुळे देशभरातील येस बँकेच्या शाखांमध्ये ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली आहे. मुंबईत देखील शाखांमध्ये ग्राहकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. दोन दिवसांपासून बँकेची नेट बँकिंग, मोबाइल ऍप, डेबिट आणि क्रेडीट कार्ड, चेक क्लिअरिंग आणि एटीम सेवा पूर्णपणे खंडीत आहे. येस  मोबाइल ऍप डाऊनलोड होत नसल्याने खातेदार हैराण झाले आहेत. त्यामुळे खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, निर्बंधानंतर येस बँकेच्या शाखांना पोलीस छावणीचे स्वरूप आले असून प्रत्येक शाखेबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2020-03-07


Related Photos