कमलापूर - दामरंचा मार्गावर टाकली नक्षली पत्रके, रस्त्याचे काम बंद करण्याची नक्षल्यांनी दिली धमकी


- परिसरात नक्षल्यांच्या दहशतीचे वातावरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी :
अहेरी तालुक्यातील कमलापूर -दामरंचा मार्गावरील तब्बल १२ किलोमीटरवर नक्षली पत्रके टाकण्यात आली आहे. या पत्रकाच्या माध्यमातून कमलापूर -दामरंचा मार्गाचे काम बंद करण्याची आणि पोलिस खबरी बंद करण्याची नक्षलवाद्यांनी धमकी दिली आहे. त्यामुळे या परिसरात नक्षल्यांची दहशत निर्माण झाली असून लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
मागील काही दिवसांपासून शांत बसलेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा आपले डोके वर काढले असून मागील दोन ते तीन दिवसांपाूसन नक्षल बॅनर्स बांधणे व पत्रके टाकून आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांकडून सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, कमलापूर -दामरंचा मार्गावरील तब्बल १२ किलोमीटरवर नक्षल पत्रके टाकून प्रधानमत्री ग्राम सडक योजनेचे काम बंद करण्याचे व पोलिस खबरी बंद करण्याची धमकी नक्षल्यांनी दिली आहे. त्यामुळे या परिसरातील जनतेमध्ये मोठी दहशत पसरली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-07


Related Photos