यंदा होळीची सुट्टी रद्द : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
होळीनिमित्त सुप्रीम कोर्टाला असलेली आठवडाभराची सुट्टी यंदा रद्द करण्यात आली आहे. होळीचा दिवस वगळता आठवडय़ातील सर्व दिवस सुप्रीम कोर्टात सुट्टीतील खंडपीठ सुरू राहणार आहे. मुख्य न्यायाधीश शरद बोबडे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे सुट्टीतील खंडपीठ हे उन्हाळी सुट्टीच्या काळातच कार्यरत असायचे, पण यंदा प्रथमच होळीची सुट्टी रद्द करून महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी सुप्रीम कोर्ट ९ ते १५ मार्चदरम्यान कार्यरत राहणार आहे.  Print


News - World | Posted : 2020-03-06


Related Photos