गांधी वाॅर्ड देसाईगंज येथे ५ लाख ५४ हजारांची दारू व मुद्देमाल केला जप्त


- एका आरोपीस अटक, एक आरोपी झाला फरार, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देसाईगंज परिसरात पोहचून गांधी वार्ड देसाईगंज येथे सापळा रचून ५ मार्च २०२० रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास १ लाख ४० हजार रुपयांची सुपर साॅनिक राॅकेट कंपनीची देशी दारू तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली चारचाकी व दुचाकी असा एकूण ५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्दे जप्त केला आहे. यात एका आरोपीला अटक केली असून अन्य एक आरोपी फरार झालेला आहे. सदर दोन्ही आरोपींवर देसाईगंज पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पाळत ठेवली. दरम्यान, आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास एक मारोती सुझुकी रिट्झ कंपनीचे चारचाकी वाहन क्र. एमएच ०१ बीएफ ००२६ तसेच सदर वाहनाच्या समोर काही अंतरावर ॲक्टिवा अशी वाहने संशयास्पद आढळून आले. यावेळी वाहन चालक योगेश विठ्इल माकडे (२५), रा. ब्रम्हपुरी यास ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता श्रावण अशोक आत्राम याच्या माध्यमाने अर्जुनी (मोर.) येथील दारू विक्री दुकानातून दारूचे बाॅक्स खरेदी करून दुचाकी चालक घनश्याम गराडे यास लोडींग असलेल्या चारचाकी वाहनासमोर पायलटंग करण्यास सांगून सदरचा माल देसाईगंज येथील चिल्लर दारू विक्रेत्यांना पुरवठा करण्याकरिता घेवून येण्यास सांगितले. त्यावरून सदर वाहन व दारू असा एकूण ५ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच देसाईगंज पोलिस ठाण्यात अटक करण्यात आलेल्या व फरार झालेल्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-05


Related Photos