निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना २० मार्चला फासी होणार : नवीन डेथ वॉरंट जारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : 
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी चार नराधम गुन्हेगारांविरुद्ध नवे डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. २० मार्चला पहाटे ५.३० वाजता तिहार तुरुंगात चार नराधमांना फासावर लटकवले जाणार आहे.
काल  बुधवारी दोषी पवन गुप्ता याची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली होती. त्यामुळे चारही दोषींना लवकरच फासावर लटकवले जाणार यावर शिक्कामोर्तब झाला होता. अखेर दोषींविरोधात गुरुवारी दुपारी अडीच वाजता चौथे डेथ वॉरंट जारी करण्यात आले.
२०१२ मध्ये घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याची क्यूरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने २ मार्च रोजी फेटाळली होती. या याचिकेद्वारे त्याने फाशीची शिक्षेचे रुपांत जन्मठेपेमध्ये करण्यात यावे अशी विनंती न्यायालयाला केली होती. २  मार्चला सकाळी झालेल्या सुनावणीवेळी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली. त्यानंतर ३ मार्चला फाशी देण्यासाठी काढण्यात आलेल्या डेथ वॉरंटला स्थगिती देण्यात न्यायालयाने नकार दिला होता. ४ मार्चला राष्ट्रपतींनी दोषी पवनची दया याचिका फेटाळली.  Print


News - World | Posted : 2020-03-05


Related Photos