गडचिरोली जिल्हा परिषद अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सामान्य प्रशासन विभागाच्या चमूला व्दितीय क्रमांक


- सीईओ डॉ. विजय राठोड यांनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत अधिकारी / कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 28 फेब्रुवारी २०२० ते १ मार्च २०२० पर्यंत आयोजित करण्यात आल्या होत्या. १. मार्च रोजी झालेल्या सांस्कृतिक स्पर्धेत जिल्हा परिषद मुख्यालयाकडून उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर यांच्या प्रोत्साहनामुळे व सहकार्याने कनिष्ठ प्रशासन अधिकारी धनंजय दुमपट्टीवार यांच्या चमुने समूह नृत्य सादर करुन व्दितीय क्रमांक पटकाविला. त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर चमुमध्ये वरिष्ठ सहायक सुनीता दाउवार, कनिष्ठ सहायक अमित कवाडघरे, कनिष्ठ सहायक सारंग गायकवाड, लेखापाल अश्विनी खेवले, कनिष्ठ सहायक श्रीमती शारदा कोवे, लिपिक रिना दरडमारे, कम्पुटर ऑपरेटर रोशन कोडाप, स. वि. तज्ञ नादीया शेख, जि. स. धीरज सेलोटे, परिचर भारती कन्नाके यांनी सहभाग घेतला होता. जिल्हा परिषद मुख्यालयास प्राप्त सन्मानचिन्ह जिल्हा परिषद कार्यालयात जतन करुन ठेवण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांना सुपूर्द करण्यात आले. या यशाबद्दल चमुचे जिल्हा परिषदेमध्ये कौतूक करण्यात येत आहे. विशेष करुन सामान्य प्रशासन या अतिमहत्वाच्या विभागात सेवा देत असताना सुद्धा वेळात वेळ काढुन कनिष्ठ प्रशासन अधिकारी धनंजय दुमपट्टीवार यांनी नृत्य सादर करुन व्दितीय क्रमांक पटकाविल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दुमपट्टीवार यांचे कौतुक केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-04


Related Photos