खोब्रामेंढा जंगलात उडाली पोलिस-नक्षल चकमक, नक्षल्यांचे शिबिर केले उद्ध्वस्त


- नक्षल साहित्य पोलिसांनी घेतले ताब्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा गावाजवळच्या जंगलात पोलिस व नक्षल्यांमध्ये आज सकाळी चकमक उडाली. पोलिसांनी नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त केले असून, त्यांचे साहित्यही ताब्यात घेतले आहे. खोब्रामेंढा जंगलात नक्षल्यांचे शिबिर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस दलाच्या सी-६० पथकाच्या जवानांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान सुरू केले. दरम्यान, पोलिसांना पाहताच नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी जंगलातून पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर शोध मोहीम राबविली असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य आढळून आले असून सदर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिबिरात ६० ते ७० नक्षली असल्याची माहिती आहे. पोलिसांचा घातपात करण्याची नक्षल्यांची योजना होती. परंतु जवानांनी नक्षल्यांचे मनसुबे हाणून पाडले, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-04


Related Photos