गडचिरोलीत गारपिटेसह मुसळधार पाऊस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. विदर्भातील काही भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली . त्यातच आज गडचिरोलीमध्ये दुपारच्या सुमारास गारपिटेसह मुसळधार पाऊस झाला . 
गडचिरोली शहरात जवळपास १५ मिनिते गारपिटीचा मोठा मारा झाला. त्यामुळे गारांचा अक्षरश: खच पडल्याचे चित्र बघायला मिळाले. व काही काळ विद्युत पुरवठा सुद्धा खंडीत झाला होता . गडचिरोली शहरासह जिल्हातील इतर भागात सुद्धा गारपिटेसह पाऊसाने हजेरी लावली . गडचिरोली शहरात रस्त्यावर गारांचा पांढराशुभ्र खच पडल्याचं चित्र दिसत होते. परंतु या गारपिटीचा शेतकऱ्यांना सर्वात जास्त फटका बसलेला आहे .
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-03-03


Related Photos