निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींची फाशी पुन्हा टळली : पुढील आदेश येईपर्यंत फाशीला स्थगिती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : 
दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी चौघा दोषींना उद्या फाशी देण्याची तयारी झाली होती. पण दोषींपैकी एक असलेल्या पवनने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली. या याचिकेवर निर्णय झालेला नाही. यामुळे चौघांना उद्या होणारी फाशी टळली आहे. पुढील आदेश येईपर्यंत दोषींच्या फाशीवर दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टने स्थगिती दिली.
निर्भयाच्या सर्व चार दोषींची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळल्याचं सांगण्यात येतं होते. यानुसार तिराह तुरुंगात त्यांना फासावर लटकवण्यासाठी तयारीही सुरू झाली होती. पण चौघा दोषींपैकी एक असलेल्या पवनच्या दया याचिकेवर राष्ट्रपतींनी निर्णय दिलेला नाही. त्याच्या दया याचिकेवर निर्णय व्हायचा आहे. हे समोर आल्यावर पतियाळा हाऊस कोर्टाने दोषींना उद्या होणाऱ्या फाशीवर स्थगिती दिली आहे. या प्रकरणी पुढील आदेश येईपर्यंत दोषींच्या फाशीवर स्थगिती देण्यात येत असल्याचं पतियाळा हाऊस कोर्टाने सांगितले.
निर्भयाच्या दोषींना उद्या होणाऱ्या फाशीवर पतियाळा हाउस कोर्टाने स्थगिती दिल्याने निर्भयाच्या आईचा संताप झाला आहे. आपल्या देशातील यंत्रणा ही गुन्हेगारांना पाठिशी घालणारी आहे, असं निर्भयाची आई म्हणाली. 'निर्भया'च्या दोषींना नक्की कधी फाशी दिली जाईल ? असा सवाल त्यांनी सरकार आणि कोर्टाला केला.  Print


News - World | Posted : 2020-03-02


Related Photos