मुलीची हत्या करून आई-वडिलांनी गळफास घेऊन केली आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / डोंबविली :
कल्याण ग्रामीण विधासभेतील एका गावात कुटुंबाने आत्महत्या केली आहे. आई-वडील आणि मुलगी यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली. हि घटना डोंबिवली मधील वाकलण गावात  घडली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 
पती शिवराम पाटील , त्यांची पत्नी दीपिका पाटील आणि मुलगी अनुष्का पाटील अशी मृतांची नावे आहेत. दीपिका पाटील यांनी आत्महत्येपूर्वी एक चिट्ठी लिहून त्याचा फोटो आपल्या कुटुंबियांच्या व्हाट्सअँप ग्रुपवर पाठवला. त्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार समोर आला आहे. आमच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी आम्ही आत्महत्या करत असून, आमच्या आत्महत्येला आमच्या कुटुंबियांना जवाबदार धरावे असा या चिट्ठीतील मजकूर आहे.
त्या मजकुरात १३ जणांची नावे लिहिली असून, त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. पोलीस या घटनेचा अत्यंत कसून तपास करत आहेत आणि मजकुरातील १३ जणांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. दुसऱ्या पद्धतीने सुद्धा पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांनी त्या तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळील रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. पोलीस संपूर्ण घराची झडती घेत असून, शेजारील नागरिकांची सुद्धा चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  Print


News - Rajy | Posted : 2020-03-02


Related Photos