निर्भया प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची विनंती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याचि क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय. पवननं आपल्या अर्जात घटनेवेळी आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. यापूर्वी त्याची रिव्ह्यू याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं सर्वसंमतीनं पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका आज फेटाळून लावलीय. ही क्युरेटिव्ह पिटिशन कोर्टानं फेटाळली तरीदेखील दोषी पवनजवळ दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.  Print


News - World | Posted : 2020-03-02


Related Photos