मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते म्हाडाच्या घरांची सोडत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : 
मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते घरांची संगणकीय सोडत काढण्यात आली. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या या यादीत एकूण ३ हजार ८९४  घरांच्या सोडतीची घोषणा झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसांकडून या हक्काच्या घरांपैकी एकही घर विकणार नाही, असं वचन घेतलं आहे.
तुमच्यामुळे आज आम्ही आहोत. कित्येक लोकांनी यात बलिदान दिलं आहे. त्यामुळे आज तुमच्यासाठी काही केलं नाही, तर इतिहासात आमची नतद्रष्ट म्हणून नोंद होईल. म्हणूनच हे सगळं करायचं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ही घरं तुमच्यासाठी देतो आहे. मला वचन द्या, यातील एकही घर विकायचं नाही. रक्त सांडवून मिळवलेली मुंबई आपली आहे. तिला विकून जाऊ नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, मी गिरणी कामगारांमध्येच लहानाचा मोठा झालो आहे. हे तुमचं ऋण आहे. त्यातून मी मुक्त होऊ शकत नाही. मी आज येथे तुमच्यासमोर मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही. तुमच्यासाठी कितीही केलं तरी ते कमीच असेल, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.  Print


News - Rajy | Posted : 2020-03-01


Related Photos