कर्जमाफीची दुसरी यादी झाली जाहीर : यादीत १५ जिल्ह्यांचा समावेश


- संध्याकाळपर्यंत खात्यात रक्कम जमा करण्याचे काम सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई  :
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. या यादीत १५ जिल्ह्याचा समावेश आहे. दरम्यान सहा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे ६ जिल्हे वगळून जिल्हे वगळून १५  जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्याची करण्याची घोषणा नागपुरमध्ये झालेल्या पहिल्या हिवाळी अधिवेशनात केली होती. त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. गेल्या २४ फेब्रुवारीला कर्जमाफीची पहिली यादी जाहीर झाली होती.ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शुक्रवारी कर्जमुक्ती योजनेतील कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी दुसरी यादी जाहीर झाली नव्हती. धुळे, हिंगोली, चंद्रपूर, वाशिम, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील कर्जमाफी शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. विभागीय निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कोल्हापूरच्या यादीची वाट पाहत होते. राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे यादी जाहीर करण्याबाबत मत मागवले होते. त्यानंतर दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. याआधी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत ६८  गावांतील १५ हजार ३५८  शेतकऱ्यांचा समावेश होता. प्रत्येक जिल्ह्यातील २ गावांचा यामध्ये समावेश होता. आता कर्जमाफीची दुसरी यादीही जाहीर झाली आहे. दुसऱ्या यादीत १५ जिल्ह्याचा समावेश आहे. आतापर्यंत सरकारकडे ३५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती आली आहे. त्यावर काम सुरु झाले आहे. टप्प्याटप्प्याने ही यादी जाहीर केली जाईल. यात पूर्ण पारदर्शकता असेल. पहिल्या सरकारच्या काळात आम्ही लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र, ती यादीच जाहीर झाली नाही. म्हणून आम्ही प्रथम याद्या तयार करण्याचे काम हाती घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.  Print


News - Rajy | Posted : 2020-02-29


Related Photos