चंद्रपुरात वडिलांनीच आपल्या ११ वर्षाच्या मुलावर केला अनैसर्गिक अत्याचार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
चंद्रपुरात वडिलांनीच आपल्या ११ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजुरा शहरातील सोमनाथपूर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित मुलगा पाचवीमध्ये शिकत आहे. मुलावर त्याच्या वडील व अन्य एका व्यक्तीने अनैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून वडिलांसह इतर आरोपीला अटक केली आहे.
सोमनाथपूर वार्डात राहणाऱ्या या पीडित मुलाचे वडील मजुरी करतात. त्यांना दारू तथा अन्य व्यसन आहेत. याच नशेत त्यांनी मुलावर मित्रासह अनैसर्गिक अत्याचार केला. हा सर्व प्रकार मुलाच्या आईने बघितला. त्यानंतर आई व मुलाने राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी मुलाची वैद्यकीय तपासणी केली. त्यात मुलावर अत्याचार झाल्याची बाब समोर आली आहे.
राजुरा पोलिसांनी वडिलांसह अन्य एका आरोपीवर पॉक्सो व कलम ३७७ नुसार गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात राजुरा शहरातील आणखी काही लोक सहभागी आहेत असा संशय आहे. त्याचा, तपास राजुरा ठाणेदार नरेंद्र कोसुरकर करत आहेत.
दरम्यान तक्रारकर्ता मुलगा देखील बालवयातच व्यसनाधीन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातूनच मुलाला बाल सुधारगृहात ठेवण्यासाठी पाठवण्यात आले होते. मात्र त्याला तिथे प्रवेश दिला गेलानाही असेही सांगण्यात येत आहे.
राजुरा शहरात अनैसर्गिक अत्याचाराची प्रकरणे एका पाठोपाठ एक समोर येत आहे. एका कॉन्व्हेंटमध्ये अल्पवयीन मुलींवर शारीरिक अत्याचाराची घटना समोर आली होती. सदर प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पोलिसांनीच एका महिलेला मारहाण केल्याची बाब समोर आली. त्यानंतर महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण समोर आले होते. आता तर बालकावरील अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे.
  Print


News - Chandrapur | Posted : 2020-02-29


Related Photos