महत्वाच्या बातम्या

 ग्रंथोत्सवांतर्गत आयोजित ग्रंथदिंडीचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते शुभारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने दोन दिवसीय वर्धा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथून सत्यनारायन बजाज सार्वजनिक वाचनालया पर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. या‍ दिंडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी  राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिका-यांसह जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने, ग्रंथालय संघाचे राज्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन कोटेवार, महात्मा गांधी आंतरराष्ट्री हिंदी विश्व विद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बी.एस.मिरगे, विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, सुधीर गवळी उपस्थित होते.

या ग्रंथ दिंडीत मौलाना आझाद उर्दू हायस्कुल, रत्नीबाई हायस्कुल, न्यू इग्लीश हायस्कुल, केसरीमल कन्या शाळा, लोक विद्यालय, तुकडोजी महाराज शाळेचे विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. ग्रंथदिंडी जिल्हा ग्रंथालय पासुन सुरवात होऊन बजाज चौक, गुलशन हॉटेल चौक, वंजारी चौक मार्गे मार्गक्रमण करुन सत्यनारायन बजाज वाचनालय येथे दिंडीचा समारोप करण्यात आला.

ग्रंथ दिंडीत मिलिंद जुनगडे, अनिल बैस, मधुकर रोडे, शिवदास सालोडकर, सुनिल येळणे, सरोज भोसकर, प्रविण सरोदे, सचिन इंगोले, सुभाष मचाले, सुनिता खुनकर, लालचंद जनबंधु, आम्रपाली वानखेडे, प्रकाश क्षिरसागर, प्रकाश कुत्तरमारे, दत्ता लोनकर, माया डोमळे, अनिता गोमासे, प्रिती कळंबे, उत्कर्ष गवळी, प्रविण कठाणे, मनोज पाहुणे, अनिल घोडे आदी सहभागी झाले होते.





  Print






News - Wardha




Related Photos