नक्षलवाद्यांचा उत्तर गडचिरोली डीव्हिसीएम विलास कोल्हाचे एके - ४७ सह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण


-  गडचिरोली जिल्हयाच्या  इतिहासात प्रथमच डीव्हिसीचे शस्त्रांसह आत्मसमर्पण 


शासनाने  त्याच्यावर ९ लाख ५० हजार रुपयाचे बक्षीस केले होते जाहीर 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, मागील वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी गेल्या वर्षभरात गडचिरोली पोलीस दलासमोर  आत्मसमर्पण केले आहे.  त्याच बरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहे. नुकतेच एकूण ९ लाख ५० हजार रुपये बक्षीस असलेल्या नक्षलवादीचा उत्तर गडचिरोली जिल्हा सदस्यपदी कार्यरत असलेला विलास उर्फ दसरु केये कोल्हा (४४) रा. विकासपल्ली ता. एटापल्ली जिल्हा गडचिरोली याने गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचा समोर  एके -४७ सह तीन मॅगजिन व ३५ राऊंडसह आत्मसमर्पण केले. 
विलास कोल्हा हा सन २००० मध्ये एटापल्ली दलममध्ये भरती झाला होता. त्यानंतर जानेवारी २००३ पर्यंत कार्यरत राहून फेब्रुवारी २००३ ला एटापल्ली दलम मधून बदली होऊन स्टाफ टिम डिव्हीसी विकस उत्तर डिव्हीजनमध्ये उप कमांडर म्हणून डिसेंबर २००४ पर्यंत कार्यरत होता. २००५  ला पदोन्नती देवून टिपागड दलम कमांडर म्हणून ऑक्टोबर २००७ पर्यंत कार्यरत होता. नोव्हेंबर २००७  ला टिपागड दलममधून बदली होऊन चातगाव दलम कमांडर म्हणून ऑक्टोबर २००८ पर्यंत कार्यरत होता.  नोव्हेंबर २००८ ला डिव्हीसी पदावर पदोन्नती नंतर  सन २०१० मध्ये टिपागड डिव्हीसी म्हणून कार्यरत,  सप्टेंबर २०१० मध्ये कसनसूर डिव्हीसी म्हणून कार्यरत, ऑक्टोबर २०१२ मध्ये चामोर्शी डिव्हीसी म्हणून कार्यरत होता . याव्यतिरिक्त त्याने गोंदिया जिल्हयातील दरेकसा डिव्हीसी, कोरची दलम डिव्हीसी तसेच गेल्या  चार महिन्यांपासून तो चातगाव दलममध्ये डिव्हीसी म्हणून कार्यरत होता. गडचिरोली जिल्हयाच्या उत्तर भागात त्याने लोंकांमध्ये दहशत परसविली होती. गडचिरोली पोलीस दलातील विविध पोलीस स्टेशन , उपपोलीस स्टेशन, पोलिस मदत केंद्रे, येथे त्याच्यावर ४० खून , ५७ चकमक व जाळपोळीचे २४ , दरोडा ८ , अपहरण १ , इतर १७  असे तब्बल १४७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
गडचिरोली पोलीस दल व केंद्रीय राखीव पोलीस दलाने मागील काही दिवसांपासून नक्षनविरोधी राबविलेले आक्रमक नक्षलविरोधी अभियान सी-६० कमांडोने गेली वर्षभरापासून नक्षलवाद्यांवर ठेवलेला अंकुश व नक्षलींचा केलेला खात्मा, वरिष्ठ तेलगु नक्षलवाद्यांकडून आदिवासी नक्षलींचे होणारे शोषण, नक्षल संघटनेमध्ये तेलगु वरिष्ठ नक्षलवादी स्वताःचा करून घेत असलेला आर्थिक फायदा, वरिष्ठ तेलगु नक्षलवाद्यांकडून आदिवासी नक्षल महिलांचे होणारे शोषण. आदिवासी बांधवांची दिशाभुल करत त्यांना जल, जंगल व जमिनीचे खोटे स्वप्न दाखवित गेल्या अनेक वर्षापासुन आदिवासी जनतेचा व येथील भागाच्या विकासासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या  कामांना नक्षलवाद्यांची आडकाठी या सर्व बाबींना कंटाळून आपण एके ४७ सह पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्यासमोर आत्मसमर्पण करत असल्याचे विलास कोल्हाने सांगितले.
महाराष्ट्र शासनाने विलास कोल्हावर एकुण ८ लाख ५० हजाराचे बक्षीस जाहीर कले होते. विलास कोल्हा याने एक ४७  रायफलसह ३ मॅगजिन व ३५ राऊंडसह आत्मसमर्पण केल आहे. त्याला शासनातर्फे आणखी १ लाख रूपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे.
गडचिरोली पोलीस दलाची वर्षभरापासूनची सातत्यपूर्ण प्रभावी कामगिरी तसेच आदिवासी समाजाच्या विकासाप्रती असलेली बांधिलकी जपत गडचिरोली पोलीस दलाने आदिवासी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी अंमलात आणलेल्या विविध योजना व यामुळे नक्षलवाद्यांना जनसामान्याकडून होणारा विरोध, यामुळे गडचिरोली पोलीस दलासमोर इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण चातगाव दलमने नुकतेच आत्मसमर्पण केले होते. त्याचबरोबर गेलया वर्षभरापासून विलास कोल्हासह ४ डिव्हीजनल कमिटी मेंबर, २ कमांडर, २ डेप्युटी कंमांडर, २६  दलम / कंपनी / प्लाटून सदस्य व १ जनमिलीशीयाने मागील एका वर्षात गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
नक्षलमधील इतर माओवादी यांनी देखील हिंसाचाराचा मार्ग सोडून आपणच आपल्या आदिवासी बांधवावर करत असलेले अनन्वित अत्याचार थांबवून आपल्या भागाचा देखील इतर उन्नत समाजाप्रामाणे विकास व्हावा. या दृष्टीने विकासाच्या मुळ प्रवाहात येण्यासाठी आत्मसमर्पण योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-28


Related Photos