सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : 
भाजपने विधानसभेत सावरकरांचा गौरव प्रस्ताव आणला होता. मात्र, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळला आहे. त्यानंतर विधानसभेत भाजपने गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजप चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
भाजपने सभागृहात फलक दाखवत विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेचा विरोध केला. तसेच विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. महाविकास आघाडी सरकारने सावरकरांचा गौरव प्रस्ताव स्वीकारावा अशी मागणी भाजपनं केली होती.
कामकाज सल्लागार समीतीच्या बैठकीत सावरकरांचा गौरव प्रस्ताव आणण्याचा भाजपने आग्रह केला होता. मात्र, सत्ताधारी पक्षांनी याला विरोध केल्याने भाजपने टीका केली.
दरम्यान, शिवसेनेनं प्रस्ताव मान्य करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर अगोदर सावरकरांना भारतरत्न द्या, त्यानंतर गौरव प्रस्ताव स्वीकारु, असं शिवसेना नेते अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले. 
  Print


News - Rajy | Posted : 2020-02-26


Related Photos