सर्वोच्च न्यायालयातील ६ न्यायमूर्तींना स्वाईन फ्लूची लागण


- सरन्यायाधीशांनी बोलावली तातडीची बैठक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील ६ न्यायमूर्ती हे स्वाईन फ्लूची लागण झाल्याने आजारी पडले आहेत. यामुळे इतर न्यायमूर्ती आणि वकिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या परिस्थितीवर मात कशी करता येईल याबाबत चर्चा करण्यासाठी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी न्यायमूर्ती आणि बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आज मंगळवारी ६ न्यायमूर्तींना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती दिली. या आजाराची लागण न्यायमूर्ती, वकील, कर्मचारी,याचिकाकर्ते आणि सर्वसामान्यांना होई नये यासाठी लसीकरण आणि अन्य उपाय तातडीने करण्यात यावे यासाठी सरन्यायाधीशांना विनंती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती रमणा यांच्यासारख्या वकिलांनी खबरदारीचा उपाय म्हणून तोंडाला मास्क लावून कामकाज करायला सुरुवात केली आहे.
News - World | Posted : 2020-02-25