महाशिवरात्री यात्रेत ‘मी नक्षलवादी’ बॅनर ने वेधले यात्रेकरूंचे लक्ष


- महाशिवरात्री  निमित्ताने गडचिरोली जिल्हयात ठिकठिकाणी झळकले नक्षलविरोधी बॅनर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हयात महाशिवरात्री निमित्ताने चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा व चपराळा, कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी, वडसा तालुक्यातील डोंगरमेंढा येथे भव्य यात्रा भरत असते. गडचिरोली पोलीस दलाने सदर बाब हेरून या ठिकाणी नक्षलविरोधी बॅनर लावले आहेत.
नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे असे आवाहन गडचिरोली पोलीस दलाने बॅनरव्दारे केले आहे. तर नक्षवाद्यांचा क्रुर चेहरा जगासमोर आणण्यासाठी ‘मी नक्षलवादी’ या आशयाची उपहासात्मक कवितेचे बॅनर यात्रेकरूंचे मोठया प्रमाणात लक्ष वेधुन घेत आहेत. या कवितेत नक्षलवादी स्वतःच्या फायदयासाठी कशाप्रकारे आदिवासी  बांधवावर अन्याय, अत्याचार करत आहेत याचे वास्तव मांडण्यात आले आहे.
त्याचबरोबर जिल्हयातील विविध पोलिस स्टेशन, उप पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र हद्दीतील हरवलेले इसम, अनोळखी मृतदेह यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेऊन त्यांचे फोटो व इत्यंभूत माहिती सोबत देवून ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-22


Related Photos