पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच ८ हजार पोलिसांची भरती करणार : गृहमंत्री अनिल देशमुख


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्याचे पोलीस दल अधिकाधिक सक्षम करण्यासाठी लवकरच ८ हजार पोलिसांची भरती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्य सुरक्षा महामंडळामार्फत ७ हजार पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात नक्षलविरोधी अभियानाचा आढावा घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पोलीस दल सक्षमीकरणाविषयीची माहिती दिली. यावेळी गृहमंत्री म्हणाले, जिह्यातील नक्षलवादावर अंकुश ठेकण्यासाठी ५०० कोटींचे ड्रोन कॅमेरे खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे आणि तो लवकरच अंमलात येईल, असेही ते म्हणाले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-22


Related Photos