मार्कंडा यात्रेत खर्रा व तंबाखूमुक्तीचा जागर सुरू


- ग्रामपंचायत, मंदिर व पोलीस प्रशासन आणि मुक्तिपथचा संयुक्त उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चामोर्शी :
विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव हे प्रसिद्ध देवस्थान महाशिवरात्रीपासून यात्रेकरूंनी फुलून गेले आहे. यात्रेचे महत्व आणि पावित्र्य लक्षात घेता यंदा चौथ्या वर्षीही मार्कंडा यात्रा खर्रा व तंबाखूमुक्त करण्याचा जागर सुरू झाला आहे. ग्रामपंचायत, मंदिर व पोलीस प्रशासन आणि मुक्तिपथने यासाठी व्यापक जंनजागृती सुरू केली आहे. त्यामुळे या वर्षीही यात्रा खर्रा व तंबाखूमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.
वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले मार्कंडादेव मंदिर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. येथे वैनगंगा नदी उत्तरवाहिनी होत असल्याने महाशिवरात्रीच्या पर्वावर येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेत येताना भाविक खर्रा तंबाखू चे सेवन करून तर कुणी मद्यप्राशन करूनही यायचे. यामुळे यात्रेत भांडणे, अस्वच्छता असे प्रकार तर दिसायचेच पण आशा व्यासनींमुळे यात्रेचे पावित्र्यही धोक्यात आले होते. त्यामुळे हा प्रकार थांबवून यात्रा खर्रा व तंबाखूमुक्त करण्यासाठी २०१७ पासून मुक्तिपथ ने जंनजागृती अभियान सुरू केले. याला मार्कंडादेव येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत, मंदिर व पोलीस प्रशासनाचे सहकारी मिळाले आणि सलग तीन वर्ष यात्रा खर्रा व तंबाखूमुक्त राहिली. या वर्षीही व्यसनमुक्त यात्रेचा जगत सुरू झाला आहे. येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून मुक्तिपथच्या सहकार्याने यात्रेत व्यसनविरोधी जंनजागृती करीत आहे. तसेच दर्शनाला जाताना खर्रा व तंबाखू घेऊन न जाण्याचे आवाहन करीत आहे.  
यात्रेच्या नियोजनासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घेतलेल्या बैठकीत यात्रा खर्रा व तंबाखूमुक्त करण्यासंदर्भात चर्चा केली होती व अधिकार्‍यांना या बाबत सूचनाही दिल्या होत्या. ग्रामपंचायत प्रशासनाने पानठेलाधारकांना तंबाखूजन्य पदार्थ न विकण्यासंदर्भात नोटीस दिली होती. त्यामुळे किरकोळ प्रकार वळगता यात्रेत असे पदार्थ विकले जात नसल्याचे दिसून येत आहे. मुक्तिपथ भरारी पथकाने काही ठिकाणी छापे मारून तंबाखूजानी पदार्थाचा साठाही जप्त केला. त्यामुळे सर्वांच्या प्रयत्नाने सलग चौथ्या वर्षीही यात्रा खर्रा व तंबाखूमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.

चामोर्शी शहरातही बंदी

मार्कंडादेव यात्रा व्यसन व प्लास्टीकमुक्त होण्यासाठी चमोरशी नगर पंचायत द्वारे पानठेलाधारकांना असे पदार्थ न विकण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक जण चमोरशी येथूनच असे पदार्थ विकत घेऊन जातात. परिणामी यात्रेचे पावित्र्य भंग होतेच पण प्लॅस्टिक प्रदूषणदेखील होते. त्यामुळे या सर्व पदार्थांवर नगर पंचायत प्रशासनाने बंदी घातली आहे.   
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-22


Related Photos