खारडी येथील शेतशिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वैरागड (आरमोरी):
  जंगलालगत असलेल्या शेतात धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने अचानक हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना आज २३ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली . जखमीवर धानोरा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे . मुक्तेश्वर महागु मारगाये  (४५) रा.खारडी  असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे . 
आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा नजीकच्या खारडी येथील रहिवासी मुक्तेश्वर महागु मारगाये  हे सकाळी आपल्या जंगला लगत शेतातील धान पिकाची पाहणी करण्याकरिता गेले असता अचानक तिथे असलेल्या जंगली अस्वलाने  भयानक हल्ला चढवून त्यांच्या डाव्या पायाला व हाताला गंभीर इजा केली आहे . जखमी अवस्थेतच ते  बचाव करण्यासाठी शेतातील झाडावर चढण्याचा प्रयत्न करून आरडा ओरड केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धाव घेऊन त्यांना जवळील रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता आणले. मात्र रविवार असल्याने रुग्णालयात फक्त एक नर्स व ड्रायव्हर व कम्पाऊंडर होते.  त्यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना धानोरा येथील रेफेर केले. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-23


Related Photos