२०० परिक्षार्थिंनी दिली शिवसन्मान महापरिक्षा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्याची ओळख व्हावी व वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सत्यशोधक सार्वजनिक वाचनालय कुरंडीचक व्दारा काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य शिवसन्मान महापरिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परिक्षेला कुरंडीचक व परिसरातील २०० बालक व युवकांनी परिक्षा देऊन यश मिळविले.
बालगटातून मोहित भूरसे प्रथम, आरजू उसेंडी व्दितीय, राधिका मसरात तृतीय तर शिवम कमरो याने चतूर्थ क्रमांकाचे बक्षिस मिळविले. तसेच प्रौढ गटातून हेमंत काटेंगे प्रथम, विकास दोडके व्दितीय व नंदू जांगी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
ओएमआर तंत्र वापरून परिक्षेचे मुल्यांकन करून मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. परिक्षेच्या यशस्वितेसाठी सरपंच टिकेश कुमरे, अधिक्षक जितेंद्र चिवंडे, हातझाडे, विजय कन्नाक, विठठल नैताम, कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर मसराम, कोविद मडकाम, लिना करंगामी, सत्यशोधक वाचनालयाचे नंदकिशोर मसराम, उषा मसराम, शरद मसराम आदिंनी सहकार्य केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-20


Related Photos