अबुजमाड जंगल परिसरात पोलीस-नक्षल चकमक


- एक नक्षली ठार 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / अहेरी : 
उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या उपपोलीस स्टेशन लाहेरीपासून ४०  किमी अंतरावर असणाऱ्या  व छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर नक्षल्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुझमाड जंगल परिसरात नक्षल्यांचा सेंट्रल कमिटी मेंबर सोनु उर्फ भूपती याने जंगलात देशविघातक कृत्य करण्यासाठीची योजना आखण्यासाठी उभारलेल्या तळावर सी ६० जवानांनी हमला चढवत नक्षल्यांवर बेधडक कार्यवाही केली. या कार्यवाहीत १ नक्षली ठार झाला. नक्षल्यांनी सी ६० जवानांचा वाढता दबाव पाहून जवानांच्या दिशेने गोळीबार करत घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून मृत नक्षलवादयांचा मृतदेह आपल्यासोबत घेवून पळ काढला.
सि ६० जवान परतत  असतांना नक्षल्यांनी छत्तीसगड राज्यातील घमंडी व लाहेरी पासून ४०  किमी अंतरावर असलेल्या फोदेवाडा जंगल परिसरात वारंवार सी ६०  जवानांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु कठिण परिस्थितीत न डगमगता अतिदुर्गम भागातून अभियान राबवित असलेल्या सी ६० जवानांनी उत्कृष्ठ प्रदर्शन करत नक्षलवादयांचा हमला परतवून लावला. या हमल्यात नक्षल्यांची एक गोळी एक सी ६० कमांडोच्या पिटुतून आरपार गेली पंरतु जवानांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता संख्येंने २००  ते ३००  असलेल्या नक्षल्यांना जेरीस आणले.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक शैलश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अघिक्षक अजयकुमार बन्सल यांच्या नेतृत्वात करण्यात आली. 
पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी सी ६० जवानांचे व या पथकाचे नेतृत्व करत असलेल्या अपर पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांचे कौतुक केले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-17


Related Photos