अरविंद केजरीवाल यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ


- केंद्रासोबत काम करुन दिल्लीला पुढे नेणार

विदर्भ नव एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. समस्त दिल्लीकरांचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. आजपासून मी सर्वांचा मुख्यमंत्री आहे. गावी कळवा, तुमचा मुलगा मुख्यमंत्री झालाय असेही ते म्हणाले. 
निवडणुका झाल्या आहेत. निवडणुकांमध्ये टीका होत असतात. आमच्या विरोधकांनी आम्हाला काय म्हटले असेल तर आम्ही त्यांना आज माफ करत आहोत. मी केंद्र सरकारसोबत काम करुन दिल्लीला पुढे घेऊन जाणार आहे. मी पंतप्रधान मोदींना देखील निमंत्रण दिले होते पण ते व्यस्त आहेत. दिल्लीच्या विकासासाठी मला त्यांचे देखील आशीर्वाद हवे आहेत. मला सर्वांसोबत मिळून काम करायचे असल्याचे ते म्हणाले. 
दिल्लीकरांनी देशात नव्या राजकारणाल जन्म दिलाय. काम, शाळा, रुग्णालय, २४ तास वीज, पाणी, महिला सुरक्षा, भ्रष्टाचारमुक्त भारत, २१ व्या शतकाचे राजकारण दिल्लीत सुरु झाल्याचेही ते म्हणाले.  Print


News - World | Posted : 2020-02-16


Related Photos