मेडिगट्टा-कालेश्वर धरणात डुबकी मारणार - आ. धर्मरावबाबा आत्राम


- शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करण्याचा पत्रकार परिषदेत दिला इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / अहेरी :
बहुचर्चित मेडिगट्टा - कालेश्वर धरण प्रकल्पाचा फटका लगतच्या सिरोंचा तालुक्यातील आरडा, पोचमपल्ली, वडधम, तुमनूर, पेंटींपाका, जानमपल्ली, रामांजापूर, मद्दीकुंटा, नगरम, चिंतालापल्ली, नारायणपूर, रंगय्यापल्ली आदी गावाला बसला असून शेतात पाणी शिरल्याने उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानाची भरपाई मिळावी याकरिता सोमवारी १७ फेब्रुवारी रोजी धरणाच्या पाण्यात 'डुबकी' मारणार असल्याचा ईशारा माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी शनिवारी राजवाड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. पत्रकार परिषदेत माहिती देतांना माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, मेडिगट्टा-कालेश्वर जलप्रकल्प महाराष्ट्रातील सिरोंचा तालुक्यासाठी प्रकोप ठरला असून प्रायोगिक तत्वावर पंधरवाड्याआधी धरणाचे दरवाजे बंद करून पाणी अडविल्याने बॅक वॉटरमुळे परिसरातील दहा गावच्या शेतीत पाणी शिरल्याने  उभ्या डौलाराने असलेले पिकांचे अतोनात नुकसान झाले नगदी पिके पाण्यात बुडाले. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता तेलंगणा शासनाचे निषेध नोंदविण्यासाठी धरणातच डुबकी मारणार असल्याचा ईशारा देऊन आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी यावेळी मेडिगट्टा जलप्रकल्पा विरोधात संताप व्यक्त केला. पुढे आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी गोदावरी नदीवर सदर प्रकल्प नको यासाठी माझी आधीपासूनच ठाम व आग्रही भूमिका होती पण कोणालाही न जुमानता आधीच्या महाराष्ट्र सरकारने प्रकल्पासाठी हिरवा कंदील दाखविल्याने आता प्रकल्प प्रकोप करीत असल्याने परिसरात काळोख व काळे दिवस  पाहायला मिळत आहे अशी शोकांतिका व्यक्त करून झालेल्या नुकसानाचे योग्य मोबदला व भूसंपादनाची प्रक्रिया योग्यरितीने करून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा आणि परिसराला धरण ग्रस्त घोषित करावे, याकडे तेलंगणा व महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी  धरणातच 'डुबकी' मारणार असल्याचा गंभीर इशारा पत्रकार परिषदेत आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी देऊन तात्काळ नुकसान भरपाई न मिळाल्यास पुन्हा लवकरच तीव्र  जनआंदोलन छेडण्याचा आक्रमक पावित्रा घेणार असल्याचे बोलून दाखविले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-15


Related Photos