शाहीनबागमध्ये आंदोलनाला बसलेल्या महिला अमित शहांची भेट घेणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
  नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात शाहीनबागमध्ये धरणे आंदोलनाला बसलेल्या महिला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. अमित शह यांनी आंदोलकांसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव आंदोलकांनी स्वीकारला आहे. आंदोलन करणाऱ्या महिलांचे प्रतिनिधी रविवारी गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत, असं सांगण्यात येतंय. पण यावरून आंदोलकांमध्ये मतभेद असल्याचंही बोललं जातंय.
पुढच्या तीन दिवसांत सीएएच्या मुद्द्यावर कुणालाही आपली भेट घेऊन चर्चा करता येईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांनी 'टाइम्स नाउ समिट'मध्ये सांगितलं होतं. सीएएबद्दल ज्या कुणाला आक्षेप आहेत त्यांनी आपली भेट घेऊन चर्चा करावी, असं शहा म्हणाले होते.
दिल्लीतील शाहीनबागमध्ये सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात मुस्लिम महिलांचे धरणे आंदोलन सुरू आहे. गेल्या डिसेंबरपासून हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलक महिलांनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी म्हणजे उद्या दुपारी २ वाजता आंदोलक महिला अमित शहांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र आंदोलकांमध्ये यावरून मतभेद आहेत. एक गट चर्चेच्या बाजूने आहे तर एका गटाचा चर्चेला विरोध आहे. तरीही शहांना भेटणाऱ्या प्रतिनिधींमध्ये कुणाचा समावेश असेल, हे आज निश्चित करण्यात आलं.  Print


News - World | Posted : 2020-02-15


Related Photos