वाघाच्या हल्ल्यात इसम ठार : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा शिवारातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चिमूर :
तालुक्या मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशाी असलेल्या कोलारा शिवारात वाघाने इसमावर हल्ला करून ठार केल्याची घटना आज १५ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकिस आली आहे.
बालाजी डोमाजी वाघमारे (७०) रा. कोलारा ता. चिमुर जि. चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर मृत इसम हा काल १४  फेब्रुवारीला  रात्रोच्या सुमारास आपल्या शेतशिवारात जागली गेला असता वाघाने त्यावर हल्ला करून ठार केले. याबाबत वनविभागाला माहिती दिली असता वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पंचनामा करण्यारिता पाचारण झाले आहे. वाघाने मृतकाचे शरीर छाती पर्यंत फस्त केल्याचे आढळले आहे.
कोलारा हे गाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असुन या ठिकाणाहून पर्यटक ताडोबा जंगलात व्यार्घदर्शनाकरिता जात असताता. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांचा वावर दिवसेंदिवस गावाकडे होत असतांना मागील कित्येक महिन्यापासून दिसत आहे. आता पुन्हा वाघाने कोलारा येथील शेतशिवारात इसमाला वाघाने ठार केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2020-02-15


Related Photos