महत्वाच्या बातम्या

 माजी सैनिकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शस्त्रधारक व शस्त्र परवानाधारक माजी सैनिक तसेच अर्धसैनिक बल मधून निवृत्त झालेल्या वय 50 वर्षाच्या आतील सैनिकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा माजी सैनिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुक शस्त्रधारक व शस्त्र परवाना धारक माजी सैनिक तसेच अर्ध सैनिक बल मधून निवृत्त झालेल्या वय 50 वर्षाच्या आतील सैनिकांनी जन्म तारखेचा दाखला, डिस्चार्ज बुक, ओळखपत्र, शस्त्र परवाना, पॅनकार्ड, आधारकार्ड व अलीकडील काढलेले पासपोर्ट आकाराच्या दोन छायाचित्रासह 5 डिसेंबर रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे जिल्हा सैनिक अधिकारी फ्लॉ.ले.धनंजय सदाफळ यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos