विकिपीडिया आर्थिक अडचणीत : १५० रुपये देणगी म्हणून देण्याचे केले आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
विकिपीडिया म्हणजे माहितीचा खजिनाच मानला जातो. शाळा-महाविद्यालयांपासून नोकरदार आणि इतरही लोक अचूक माहिती हवी असेल, तर इंटरनेटवरील विकिपीडियाचा आधार घेतात. 
इतिहास, भूगोल, व्यक्ती, संस्था, विविध देश, तेथील सरकारे, कंपन्यांची कामगिरी, आर्थिक स्थिती असे माहितीचे भांडार सर्वांना मोफत मिळते. त्याचा अनेक जण आधार घेत असतात. विकिपीडिया १५ जानेवारी, २००१ पासून आपल्या जीवनाचा भाग बनला आहे. त्याच दिवशी इंग्रजीत सुरू झालेला विकिपीडिया आता अनेक भारतीय, तसेच परदेशी भाषेतही उपलब्ध आहे. मराठी विकिपीडियाचाही अनेक जण माहिती मिळविण्यासाठी आधार घेतात.
आता या विकिपीडियाला सर्व नेटिझन्सचीच मदत हवी आहे. त्यामुळे विकिपीडियाने भारतासह जगभरातील नेटिझन्सना जाहीर आवाहन केले आहे. विकिपीडियाचे पान उघडताच ते आवाहन दिसते. त्यात विकिपीडियाने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. आमचा विकिपीडिया हा उपक्रम सुरू ठेवण्यासाठी केवळ १५० रुपये देणगी म्हणून द्या, असे आवाहन त्यात आहे.
ना नफा, ना तोटा पद्धतीने आम्ही विकिपीडियाची सुरुवात केली, तेव्हा तुम्हाला याचा पश्चात्ताप होईल, असे अनेक जण म्हणाले होते, पण ज्ञान, माहिती अचूक व विश्वासार्ह असावी आणि ती अधिकाधिक लोकांना मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत राहिल. 



  Print






News - World | Posted : 2020-02-14






Related Photos