'व्हॅलेंटाईन डे' दिनी मुलींनी घेतली प्रेमाविवाह न करण्याची शपथ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / अमरावती : 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' ही भावना एखाद्यासमोर व्यक्त करण्यासाठी तरुण-तरुणी हमखास 'व्हॅलेंटाईन डे'ची निवड करत असतात. मात्र, अमरावतीमधील एका शाळेने या 'व्हॅलेंटाईन डे'ची चांगलीच धास्ती घेल्याचं दिसत आहे. कारण प्रेम विवाह करणार नाही अशी शपथ विद्यार्थिंनीला देण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना शाळेने एक वेगळीच शपथ घेण्यास भाग पाडले आहे. प्रेम, प्रेम विवाह आणि हुंडा घेऊन लग्न करणार नाही अशी शपथ विद्यार्थिंनी घेतली आहे.
मी अशी शपथ घेते की, माझ्या आई वडिलांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी प्रेम, प्रेम विवाह करणार नाही. तसेच माझं लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेत आहे, अशी शपथ विद्यार्थिंनींना देण्यात आली आहे.
दरम्यान, प्रेम दोन जिवांना जोडणारा दुवा म्हणून काम करत असतं. मात्र, जागतिक प्रेम दिनी प्रेमच करणार नाही, अशी शपथ देऊन शाळेने नवीन पायंडा पाडला आहे.
News - Rajy | Posted : 2020-02-14