निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी विनय शर्माची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली


- म्हटले, 'विनय मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त'

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी ठरलेला विनय शर्मा याची आणखी एक युक्ती अपयशी ठरली आहे. राष्ट्रपतींद्वारे विनय शर्मा याची दया याचिका फेटाळण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत फाशी टाळण्याची मागणी करणारे विनयची याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. आपण मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सांगत आपल्याला फाशी देऊ नये अशी मागणी विनयने सुप्रीम कोर्टात केली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र विनय हा मानसिकदृष्ट्या ठीक असल्याचे म्हटले आहे. काल गुरुवारी सुनावणीनंतर कोर्टाने हा निकाल राखून ठेवला होता.
  Print


News - World | Posted : 2020-02-14


Related Photos