बॅंक ऑफ इंडिया आलापल्ली शाखेचा भोंगळ कारभार, लिंकफेलमुळे ग्राहक कमालीचे त्रस्त


- सात वर्षानंतरही परिस्थिती जैसे थे
- कारवाई करण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आलापल्ली येथे बॅंक ऑफ इंडियाची शाखा ७ ते ८ वर्षापूर्वी स्थापन करण्यात आली आहे. मात्र तेव्हापासून आजतागायत या बॅंकेच्या शाखेची वारंवार लिंक फेल होत असल्याने या बॅंकेचे ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. लिंकफेलच्या समस्येमुळे देवाण-घेवाणाचे व्यवहार नियमित होत नाहीत. परिणामी ग्राहक बॅंकेत तातकळत राहावे लागत आहे. या बॅंकेच्या आलापल्ली शाखेचा मागील अनेक वर्षांपासून भोंगळ कारभार सुरू असताना शाखा व्यवस्थापकांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. आलापल्ली हे मध्यवर्ती व व्यापारीदृष्ट्या महत्तवाचे ठिकाण आहे. या परिसरात अनेक खेडे जोडलेली आहेत. त्यामुळे आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने आलापल्ली येथे ७ ते ८ वर्षांपूर्वी बॅंक ऑफ इंडियाची शाखा स्थापन करण्यात आली. मात्र तेव्हापासून लिंकफेलची समस्या कायम आहे. या ७ ते ८ वर्षात अनेक शाखा व्यवस्थापक बदलले. मात्र एकाही व्यवस्थापकाने ही समस्या सोडविली नाही. या बॅंकेच्या शाखेची वारंवार लिंकफेल होत असल्याने या बॅंकेत खाते असलेल्या ग्राहकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. नियमित व्यवहार होत नसल्याने ग्राहकांना तातकळत बॅंकेत राहावे लागत आहे. शिवाय आवश्यक व महत्त्वाच्यावेळी बॅंकेद्वारे व्यवहार होत नसल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष देवून समस्या सोडविण्याची मागणी बॅंकेच्या ग्राहकांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र संबंधित बॅंकेच्या व्यवस्थापकांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-14


Related Photos