नागपूरात तरुणाने केला महिलेवर अ‍ॅसिड हल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
हिंगणघाटच्या घटनेवरून सर्व राज्यात संतप्त भावना असतानाच आता नागपूरजवळही धक्कादायक घटना घडली आहे . नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत पहलेपार परिसरात एका महिलेवर एका तरुणाने  एसिड सदृश द्रव्य फेकले. संबंधित महिला सरकारी रुग्णालयाची कर्मचारी असून ती त्या परिसरात एड्स संबंधित सर्व्हे करायला गेली होती.
त्यावेळी अचानक सुमारे २५ वर्षीय तरुणाने समोर येऊन महिलेवर अ‍ॅसिडसारखा पदार्थ टाकला. द्रव पदार्थ त्या महिलेच्या हातावर पडला आणि ती जखमी झाली. घटनेच्या वेळी बाजूला खेळणाऱ्या दोन मुलींवरही त्या द्रवाचे काही शिंतोडे गेल्याने त्यांना ही त्रास झाला. त्या किरकोळ जखमी आहेत. त्या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तर त्याच वेळी बाजूला उभ्या असलेल्या एका महिलेच्या गळ्यावर त्या द्रवाचे शिंतोडे गेल्याने तिला गळ्यावर भाजले आहे. अ‍ॅसिडसारखा पदार्थ फेकणाऱ्या तरुणाचं नाव निलेश कान्हेरे आहे अशी माहितीही पुढे आली आहे .
  Print


News - Nagpur | Posted : 2020-02-13


Related Photos