आलापल्ली येथे जिल्हास्तरीय शालेय बालक्रीडा तथा पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात सुरू


- जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिली भेट

- स्पर्धांचा दुसरा दिवस : कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत तीन दिवसीय जिल्हास्तरीय शालेय बालक्रीडा व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी क्रीडा तसेच सांस्कृतिक स्पर्धा  २०१९-२०२० चे आयोजन ५ ते ८ फेब्रुवारी २०२० रोजी या कालावधीत क्रीडा संकूल आलापल्ली येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन बुधवार, ५ फेब्रुवारी २०२० रोजी पार पडले. काल विविध क्रीडा स्पर्धा पार पडल्या असून आज दुसऱ्या दिवशी सुद्धा उत्साहपूर्ण वातावरणात खेळ खेळण्यात आले. या स्पर्धांचा आस्वाद घेण्यासाठी आलापल्ली परिसरासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पुढाकारातून आलापल्ली येथे जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी, पालक व विद्याथ्र्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्पर्धांचा आस्वास घेण्यासाठी व मनोरंजनासाठी जिल्हाभरातील अनेकजण आलापल्ली येथे दाखल होत असल्याचे दिसून येत आहे. मागील दोन वर्षांपासून जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे कर्मचारयांसह पालक व विद्याथ्र्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या बाबींचा अजय कंकडालवार यांनी गांभिर्याने विचार करून जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करीत यंदा जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केल्याने जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांकडून कंकडालवार यांचे आभार मानल्या जात आहे. सदर स्पर्धा मोठ्या उत्साहात सुरू असून आज जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देवून स्पर्धा कशाप्रकारे सुरू आहेत याची पाहणी केली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-06


Related Photos