१२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना सुचना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
सन २०१९ - २०  या शैक्षणिक सत्रात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित असलेल्याविद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव अद्यापही सादर केलेला नाही अश्या विद्यार्थ्यांनी विहीतनमून्यात (Online) अर्ज आवश्यक दस्ताऐवज व इयत्ता १२ वी ची परिक्षा प्रवेश पत्र तसेच MHT-CET,JEEव NEET या सारख्या प्रवेश पात्रता परीक्षेकरीता भरण्यास आलेल्या अर्जाची प्रतीसह दिनांक ३१ मार्च २०२०पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीयआय.टी.आय. चौक कॉम्प्लेक्स, गडचिरोली समिती कार्यालयास सादर करावे. असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हाजात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली यांनी केले आहेत.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-06


Related Photos