पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शनकेंद्र व शासकीय औद्योगिकप्रशिक्षण संस्था, देसाईगंज (वडसा) यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दि. ५ फेब्रुवारी २०२०  रोजी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देसाईगंज येथे संपन्न झाला.मेळाव्यामध्ये एकूण ५१० उमेदवारांचा सहभाग होता. तसेच १५ विविध कंपन्यांचा. मेसर्स मोराराजी टेक्सआईल्स
लिमी, एमआयडिसी बुटीबोरी प्लॉट नं-ती-२ सलाईदाभा बुटीबोरी नागपूर, मेसर्स सुपेरिअर ड्रिक्स प्राईवेटलिमीटेड, एमआयडीसी,बुटीबोरी नागपूर, मेसर्स हेल्दीराम फुडस इंटरनॅशनल प्रा.लि.प्लॉट नं.१४५,भंडारारोड, नागपूर, मेसर्स विरोहन इंन्स्टीटयूट ऑफ हेल्थ एन्ड मॅनेजट सायन्स १९२ भामटी परसोडी रिंगरोड,त्रिमूर्तीनगर नागपूर, मेसर्स झिम लॅबॉरेटोरीज लिमी.एमआयडीसी एरिया, नागपूर, मेसर्स बॅरि शेषराव वानखेडे,
शेतकरी सह सुत गिरणी,बुटीबोरी ,नागपूर, मेसर्स विसाका इंडस्ट्रिज लिमी,भंडारा रोड, चिरवा ता.मौदाजि.नागपूर, मेसर्स नवकिसान बायोप्लाटेक लिमी,रिंगरोड,सुयोगनगर,नागपूर, मेसर्स युरेका फोर्ब्स ५०३ पाचवा माळा,वर्धा रोड,नागपूर, मेसर्स चानविम इंजिनिअरींग इंडिया लिमी,अमरावती रोड,नागपूर, मेसर्सशुअरटेक हॉस्पिटल एन्ड रिसर्च सेंटर, धंतोली नागपूर, मेसर्स सिम्प्लेक्स आरयन स्टील कं. प्रा.लि.एमआयडिसी
हिंगणा, नागपूर, मेसर्स एस.बी.आय, लाईफ ईन्शुरंन्स लिमी. रामदासपेठ नागपूर,मेसर्स,एस.आय.एस.हैद्राबाद, मेसर्स, कॅप्टन सेक्युरिटी,हैद्राबाद, मेसर्स स्किल रुठ एडयूटेक इंडियाप्रा.लि.नागपूर, या कंपन्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रवीण खंडारे यांनी कुशल महाराष्ट्र रोजगार युक्त महाराष्ट्र या विभागाच्या ध्येयधोरणानुसार गडचिरेाली जिल्ह्यामध्ये रोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल या करीता नियोजन करणार असल्याचेसांगितले. तसेच या पुढे रोजगार मेळावे अतिदुर्गम भागामध्ये घेण्याचे नियेाजित केले आहे. यामध्ये सिरोंचा, भामरागड,एटापल्ली येथे घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे देसाईगंज (वडसा) प्राचार्य विकासआडे हे उपस्थित होते. यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कौशल्य विकास अधिकारी,गडचिरोली शैलेश भगत यांनी केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-06


Related Photos