छाव्यांशी खेळत असणाऱ्या लहान मुलाचे शीर सिंहिणीने केलं धडापासून वेगळं


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / बछादार :
गुजरातमधील गीर अभयारण्याजवळच्या गावामध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. येथील बछादार गावामध्ये सिंहिणीच्या छाव्याबरोबर खेळत असणाऱ्या एका मुलाच्या जिवावर बेतलं. छाव्यांशी खेळत असणाऱ्या या लहान मुलाला सिंहीणीने ठार केलं. धक्कादायक बाब म्हणजे सिंहिणीनं या मुलाला जंगलामध्ये तीन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. सिंहीणीच्या या हिंसक हल्ल्यामध्ये या मुलाचं शीर शरीरापासून वेगळं झालं. मंगळवारी घडलेल्या या घटनेची माहिती पोलीस आणि वन अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी गावात धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील गीर अभयारण्याजवळील अमरेली जिल्ह्यात असणाऱ्या बछादार गावात ही दूर्देवी घटना घडली. किशोर देवीपूजक असे मृत मुलाचे नावं असून तो त्याच्या आई वडिलांबरोबर एका छोट्या झोपडीत राहत होता. मंगळवारी किशोर आपल्या घराबाहेर अंगणात झोपला होता. त्यावेळी अचानक जवळच्या झुडपांमधून सिंहाचे दोन छावे तेथे आले. छाव्यांच्या डरकाळीमुळे किशोरला जाग आली तेव्हा दोन्ही छावे त्याच्यासमोरच उभे होते. हे छावे आपल्यावर हल्ला करतील असं अंदाजही लहानश्या किशोरला नव्हता. तो त्या छाव्यांशी खेळू लागला. सिंहाच्या छाव्यांचा आवाज येऊ लागल्याने किशोरचे पालक झोपडीबाहेर आले. समोरचे दृष्य बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते काही करण्याआधीच झुडपामधून सिंहिणीनं किशोरवर झडप घातली आणि त्याला जंगलात फरफटतं नेलं. किशोरच्या पालकांनी या सिंहिणीचा आणि तिच्या छाव्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काहीच फायदा झाला आहे. ही सिंहिण किशोरला जबड्यामध्ये पकडून जंगलामध्ये तीन किलोमीटरपर्यंत निघून गेली.
या घटनेसंदर्भात वन अधिकारी आणि पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी किशोरच्या पालकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शोध घेतला असता त्यांना किशोरच्या शरिराचे अवशेष अढळून आले. किशोरचे शीर अद्याप सापडलेलं नाही. पोलीस आणि वन अधिकाऱ्यांना सिंहिणी आणि तिच्या छाव्यांचा शोध घेण्यात यश मिळालं आहे
  Print


News - World | Posted : 2020-02-06


Related Photos