कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी बँक खाते आधार संलग्न करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहिर केलीआहे.या योजने अंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत पिककर्ज घेतलेले किंवा रुपांतर झालेले ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत मुद्दल व व्याजासह थकीत व परतफेड न झालेले २ लाख रुपया पर्यंतचे कर्जअसणाऱ्या शेतक-यांना २ लाख रुपयाच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. या कर्जमुक्तीचा लाभघेण्यासाठी कर्जदार शेतक-यांचा आधार क्रमांक हा त्यांच्या कर्ज खात्याशी जोडलेला असणे आवश्यक आहे.त्यामुळे जिल्हयातील१७०० शेतक-यांचे आधार क्रमांक अद्यापही कर्जखात्याशी जोडलेले नाहीत व योजनेच्याप्रभावी अंमलबजावणी योजनेच्या कर्जदार खात्याशी त्यांचे आधार क्रमांक जोडलेले असणे अत्यावश्यक आहे.त्यामुळे शेतक-यांनी कर्ज खाते आधार संलग्न करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गौतमवालदे यांनी केले आहे.जिल्हयातील बँकांनी अशा आधार क्रमांक जोडला नसलेल्या शेतक-यांच्या यादया बँकेच्या सुचनाफलकावर तसेच ग्राम पंचायत व चावडीवर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. या यादीत नाव असणा-या शेतक-यानी आपला आधार क्रमांक बँकेला दिलेला नाही अशा कर्जदार शेतक-यानी त्यांचे आधार क्रमांककर्जखात्याशी जोडणीसाठी आधार कार्डची सांक्षाकित प्रत संबधित बँकेच्या शाखेत तात्काळ उपलब्ध करुनदेण्यात यावी . जेणे करुन त्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेता येईल. असेजिल्हा उपनिबंधक सहकारी संथा यांनी कळविले आहे.  Print


News - Wardha | Posted : 2020-02-06


Related Photos