देवेंद्र फडणवीसांना राज्यसभेवर संधी देऊन केंद्रात पाठवण्याची भाजपची तयारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्यात राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना राज्यसभेवर संधी देऊन केंद्रात पाठवण्याची भाजपनं तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्यात येणाऱ्या सात सदस्यांमध्ये भाजपचे तीन तर महाविकास आघाडीचे चार असे उमेदवार सहज निवडून येतील अशी स्थिती आहे. आठवलेंना भाजपनं आश्वासन दिले आहे. 
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना स्थान देण्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात सरकार नसल्यास फडणवीसांचा केंद्र सरकारमध्ये उपयोग करून घ्यावा अशी श्रेष्ठींची इच्छा असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. 
आघाडीच्या चारपैकी 2 जागांसाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न आहेत. शिवसेनेशी यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय. एका जागेवर शरद पवारांचं नाव निश्चित असून दुसरी जागा मिळाल्यास माजिद मेनन यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.    Print


News - Rajy | Posted : 2020-02-06


Related Photos