गांजा आणि भांगेच्या शेतीला कायदेशीर करण्याची खासदारांची संसदेत मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
गांजा आणि भांग या दोन अंमली पदार्थांवर अनेक देशांत बंदी आहे. मात्र, या दोन पिकांच्या शेतीला प्रोत्साहन मिळावं यासाठी हे दोन्ही पदार्थ कायदेशीर करण्याची मागणी संसदेच्या ४६ खासदारांनी केली आहे. नेपाळमध्ये गेल्या ४७ वर्षांपासून या पिकांच्या उत्पादनावर असलेले निर्बंध हटवावेत अशी मागणीही करण्यात येत आहे.
नेपाळमध्ये सध्या अवैध पद्धतीने या पिकांचं उत्पादन घेतलं जातं. नेपाळमध्ये १९७३ सालापासून गांजा आणि भांग यांच्या उत्पादनाला प्रतिबंध करण्यात आला आहे. अमेरिका, कॅनडा आणि जर्मनीतही आधी गांजा आणि भांग उत्पादनाला प्रतिबंध होता. मग नंतर या तिन्ही देशांनी ते निर्बंध हटवले. त्याचा संदर्भ या खासदारांनी संसदेत दिला आहे.
नेपाळमधूनही या पिकांवरील प्रतिबंध हटवल्यास शेतकऱ्यांना वैध पद्धतीने उत्पादन घेता येईल आणि त्याचा वापर औषधांसाठी करण्यात येऊ शकतो. तसंच त्याच्या निर्यातीतूनही बरंच उत्पन्न मिळेल, अशी मागणी नेपाळच्या संसदेतील ४६ खासदारांनी केली आहे. त्याऐवजी नेपाळमध्ये दारुबंदी जारी करावी अशी मागणी केली आहे. नेपाळ सरकारने अद्याप यावर कोणताही विचारविनिमय केलेला नाही.  Print


News - World | Posted : 2020-02-04


Related Photos