नागरिकांनी आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा : जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी / अहेरी :
जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने पंचायत समिति अहेरी अंतर्गत गुड्डीगुड्म येथील  शासकीय आश्रम शाळेच्या पटांगणात तालुका आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या परिसरातील गुड्डडीगुडम हे गाव मध्यवर्ती ठिकाण असून शासकीय आश्रम शाळा असल्याने विद्यार्थी व परिसरातील जास्तीत जास्त महिला, पुरुष, लहान बालकांचे आरोग्य तपासणी करण्यासाठी तज्ञ वैद्यकिय अधिकारी शिबिरात तपासणी करून उपचार करणार असून तपासणी व औषध उपचार मोफत आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी सदर शिबिराच्या पुरेपूर लाभ घ्यावा असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलतांना केले . जिल्हा परिषदेच १३ वा वने योजनेतून जिल्हातील १२ ही तालुक्यात सदर शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. 
कार्यक्रमाला विशेष अतिथि म्हणून अहेरी पंचायत समितिचे सभापती भास्कर तलांडे, तिमरमचे सरपंच महेश मडावी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण वानखेडे, डॉ.राकेश गावतूरे, डॉ.अभिलाषा बेहरे, डॉ.उषा दुर्गम, डॉ.सत्यनारायण दुर्गम, डॉ.दिपक जोगदंड डॉ.पवन ऊइके, डॉ.राजेश मानकर, मुख्याध्यापक शिवनकर आदि मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.वानखेडे यांनी केले तर आभार  डॉ.मानकर यांनी मानले . यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी शाळेतील शिक्षक विद्यार्थी व नागरिक बहुसंख्यानी उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-02


Related Photos