महाराष्ट्र राज्य मानवी हक्क राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले राज्यात दुसरे


- पोलीस महासंचालक सुबोध जायस्वाल यांच्या हस्त प्रमाणपत्र व रोख पारितोषीक देवुन सन्मानित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई यांच्या व्दारे नुकत्याच राज्य स्तरावर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य मानवी हक्क वादविवाद स्पर्धेत गडचिरोली जिल्हयाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले यांनी मराठी विभागात उत्कृष्ट कामगिरी नोंदवत राज्यात दुसरे स्थान पटकाविले आहे. त्यांच्या या कामगीरीमुळे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या हस्ते रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देवुन त्यांचा गौरव करण्यात आला.
गडचिरोली परिक्षत्र स्तरावर झालेली स्पर्धा स्वप्नील गोपाले यांनी आपल्या उत्तम वत्कृत्वाने गाजवल्या नंतर त्यांना परिक्षेत्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले होते. यामुळे त्यांना काल १ फेब्रुवारी ला मुंबई येथे होणाऱ्या  स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला होता. या ठिकाणी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करतांना त्यांनी 'सामजिक पंरपरा मानवाधिकारास पोषक की शोषक' या विषयावर बोलतांना सामाजिक परंपरा मानवाधिकारास कशा प्रकारे शोषक आहेत या बाबतीत आपले विचार अत्यंत परखडपणे मांडले. यामुळेच सदर स्पर्धेत देखील त्यांनी यशाची परंपरा कायम राखत दुसरे स्थान मिळविले. पोलिस महासंचालक यांनी त्याचे विशेष कौतुक केले आहे.
त्यांच्या या उत्तुंग व अभिमानास्पद यशाबद्दल पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी गोपाले यांच्या कामगिरीचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-02


Related Photos