गडचिरोली येथे गव्हाणी घुबडावर केली यशस्वी शस्त्रक्रिया


- वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांचा पुढाकार, वनकर्मचारी व डाॅक्टरांचेही लाभले सहकार्य

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
येथील रहिवासी लाकडे यांच्या घरासमोरील अंगणात जखमी अवस्थेत असलेल्या गव्हाणी जातीच्या घुबडाला पकडून येथील वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांचया पुढाकारातून त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यापूर्वी अनेक प्राण्यांवर व मानवावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे ऐकले आहे. मात्र गडचिरोली येथे पक्ष्यांवर विशेषतः घुबडावर शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
लाकडे यांच्या घरासमोर गव्हाणी जातीचा घुबड असल्याची माहिती मिळाली. लगेच वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर यांनी घटनास्थळी जाउन त्या घुबडाला पकडले व त्याला कुठे इजा झाली याची पाहणी केली. यावेळी त्या घुबडाच्या डाव्या पंखाचे हाड मोडले असल्याने त्याला व्यवस्थित उडता येत नसल्याची खात्री पटली. त्यामुळे कुकडकर यांनी गडचिरोली क्षेत्र सहायक पी. जेनेकर यांना माहिती दिली व उपचाराकरिता पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले. यावेळी डाॅ. शिवशंकर चिकोडी, डाॅ. कमलेश श्रीरामे, डाॅ. अनिल डांगे यांनी त्या जखमी घुबडाची तपासणी करून तुटलेल्या पंखाच्या हाडावर शस्त्रक्रिया करून त्याची दुखापत कमी करण्यात आली. सदर घुबडाची जखमी भरेपर्यंत देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. याकरिता स्पंदन हाॅस्पिटलचे डाॅ. नरोटे व नोबल हाॅस्पिटलचे डाॅ. सहारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल वन्यजीवप्रेमी अजय कुकडकर व डाॅक्टर मंडळीचे कौतूक करण्यात येत आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-02-01


Related Photos